‘’नमस्कार मित्रानो’’ ग्रामीण भागातील गृहिणी किंवा ज्यांना स्वत:चा व्यवसाय करायची इच्छा आहे यांना सर्वात जास्त पडणार प्रश्न म्हणजे ग्रामीण भागात कोणता व्यवसाय करावा, आता मित्रांनो ग्रामीण भागात बघितल तर आपल्याला कडधण्याचे उत्पादन जास्त आढळून येईल. आणि ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता आणि किंमत यात नेहमी किमतीचाच विजय होतो. तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच भागात कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कडधान्यावर प्रक्रिया करून त्यापासून डाळनिर्मिती करणे हा व्यवसाय आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. त्या दृष्टीने आपण डाळ मिल व्यवसाय खूप जोराने पुढे घेऊन जाऊ शकतो. हा व्यवसाय बिलकुल अवघड नाही.
ग्रामीण भागातील तरुणांना व तरुणींना तसेच गृहिणी असतील किंवा कुणाला स्वत:चा व्यवसाय करायचा आहे. डाळ मिल हा स्वत:चा व्यवसाय तुम्हाला साक्षर होण्यासाठी नक्कीच मोलाचा ठरेल. मित्रांनो म्हणून ह्या व्यवसायाला ग्रामीण भागातील व्यवसायाचा कणा असे म्हंटले जाते.