नमस्कार मित्रानो आज कमी खर्चापासून उद्योगाबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे डाळ मिल उद्योग ( DAL MILL BUSINESS)आपण मिनी डाळ मिल चा वापर करून वेगळ-वेगळ्या डाळी बनवू शकतो. जस की हरभरा, मूग, उडीद इत्यादी ग्रामीण भागात कडधान्याचे उत्पादन जास्त असले तरी प्रक्रिया करण्यासाठी मशिन ची कमतरता भासते.
शेतकऱ्याकडून कमी दरात कडधान्य घेऊन त्यावर प्रक्रिया करून खूप चांगल्या दरात डाळ विकली जाते.आपल्याला व्यवसाय करायची इच्छा खूप आहे पण आपल्याला जर कुठे आर्थिक अडचणी मुळे व्यवसाय सुरू करायला अडचण येते काही हरकत नाही आपण हा डाळ मिल चा व्यवसाय करून खूप मोठ्या पातळी वर आपला बिझनेस घेऊन जाऊ शकतो.आणि ह्या बिझनेस साठी कोणत्याही वयाचे बंधन नाही. हा बिझनेस एखादा शिक्षण घेत असलेला विद्यार्थी किंवा एखादी गृहिणी ही करू शकते. आणि आसपासच्या डीलर सोबत टायप करून, स्वतः पॅकेजिंग करून स्वतःचा ब्रँड वापरून विक्री करू शकता.