मा. संतोष गादे
अहमदनगर जिल्ह्यातील शहरटाकळी (ता.शेवगाव) येथील संतोष गादे या अल्पभूधारक शेतकऱ्याचा संघर्ष रंजक आहे. अल्प शेतीमुळे शेती पूरक व्यवसायाचा शोध घेणाऱ्या संतोष यांनी डाळनिर्मिती आणि त्यापुढे जात अथक अनुभवातून डाळ मिल यंत्रे तयार करण्यास सुरुवात केली. काळानुसार नवे तंत्रज्ञान व विविध वैशिष्टयांचा समावेश करीत यंत्रउदयोगाचा ‘ज्ञानेश्वरी’ ब्रॅंड त्यांनी लोकप्रिय केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे संतोष व संदीप हे गादे बंधु राहतात. संतोष यांचे पदवी पर्यंत शिक्षण झाले आहे. संदीप सेतु केंद्र चालवतात. कुटुंबाला केवळ एक एकर जमीन. मात्र तेवढयावर कुटुंबाची गुजराना करणे शक्य होत नव्हते . त्यामुळे संतोष यांनी शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघात सचिव म्हणून नोकरी केली. मात्र व्यवसाय सुरू करून त्यात प्रगती करायची त्यांची इच्छा होती. नोकरी सांभाळून आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीही ते स्वत: करीत असतं .
डाळ मिल यंत्राने दिली दिशा
सुमारे पंधरा वर्षंपूर्वीची गोष्ट, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने संशोधित केलेल्या PKV मिनी डाळ मिल यंत्राची माहिती संतोष यांना ‘अग्रोवण’ मध्ये वाचण्यास मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी विद्यापीठात गेले. आवश्यक ७० हजार रुपयांची महिन्याभरात जुळवाजुळव केली. कुटुंबाकडे सोळा वर्षापूर्वी तीन हजार पक्ष क्षमतेचे शेड होते. त्या शेजारीच डाळ मिल उभारली. या भागातील हा पहिलाच व्यवसाय असल्याने अनेक जण केवळ व्यवसाय पाहण्यासाठी येत. कृषि विभाग, पंतप्रधान ग्रामीण उद्योजकता विकास योजनेतून नव उद्योजकांना अनुदान असल्याने व्यवसायाला चालना मिळाली. त्यातून हा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांना सुमारे ४० जणांना संतोष यांनी अकोले, जळगाव भागांतून डाळ मिल खरेदी करून दिली.
दुरुस्तीतून यंत्रनिर्मिती
शहर टाकळी येथील व्यवसायात जम बसला होता. मात्र दुरुस्ती व अन्य अडचणीही येत होत्या . प्रत्येक वेळी यंत्र तयार करणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधि येणे शक्य नव्हते. हीच अडचण अन्य शेतकऱ्यांनादेखील येऊ लागली होती. दुसरीकडे यंत्रांना मागणीही वाढू लागली होती. मग अनुभवाच्या जोरावर संतोष यांनी स्थानिक करागिरांच्या मदतीने शहर टाकळीत 2018 मध्ये डाळ मिल निर्मिती सुरू केलीय. त्यासाठी दोन लाखांची गुंतवणूक केली. बेडिंग मशिन, ड्रिल, लेथ, पत्रा कटींग, इत्यादी. गरजेच्या यंत्राची खरेदी केली. सहा महिन्यांनी नेवासा फाटा (ता. नेवासा) येथे भाडेतत्वावर जागा घेऊन कामाला सुरवात केली.
तंत्रज्ञानात सुधारणा
‘PKV मिनी डाळ मिल’ यंत्रात गरजेनुसार काही बदल केले. पहिले यंत्र तयार करण्यास एक महिन्याचा कालावधी लागला. हळूहळू त्यात कौशल्य येत गेले. पहिल्या वर्षात केवळ पंधरा मशिन यंत्रे तयार केली गेली. सर्व प्रकारच्या डाळी कडधान्यांची डाळ तयार करण्यात येत असल्याने शेतकाऱ्यांकडून चांगली मागणी वाढली. पाचशेहून अधिक शेतकऱ्यांना आम्ही आमचे मशीन्स पुरवले आहेत. जवळपास साठपैकी यंत्रे महिला बचत गट, तर साडेतीशेहून अधिक यंत्रे शेतकाऱ्यानी पुरवले आहेत. आता नेवासा फाटा व घोडेगाव (ता. नेवासा) औद्योगीक वसाहतीत वर्कशॉप उभारले आहे.
सोळा मजुरांना रोजगार
अल्पभूधारक असल्याने एकेकाळी स्वत: नोकरी शोधणारे, मिळालेली नोकरी टिकवून व्यवसाय उभा करण्याची धडपड करणारे संतोष यांनी आपल्या उद्योगातून सुमारे सोळा मजुरांना रोजगार दिला आहे. राज्य सरकारकडून त्यांना पुरस्काराने गौरवलेही आहे.